गोवंशाची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कामठी (जि.नागपूर)  : येथील अवैध कत्तलखाण्यात जाणाऱ्या 25 गोवंशाला नवीन कामठी पोलिसांनी जीवदान दिले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई नवीन कामठी पोलिसांनी लिहिगाव मार्गावर सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास केली. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलिसांचे डीबी पथक लिहिगाव मार्गावर गस्तीवर फिरत असताना जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे महालगाव ते लिहिगाव मार्गावरील कल्याणी राइस मिल समोरील रस्त्यावर नाकाबंदी केली. कामठीकडे येत असलेले दहा चाकी कंटेनरला थांबविले असता ट्रकचालक व इतर दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

कामठी (जि.नागपूर)  : येथील अवैध कत्तलखाण्यात जाणाऱ्या 25 गोवंशाला नवीन कामठी पोलिसांनी जीवदान दिले. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई नवीन कामठी पोलिसांनी लिहिगाव मार्गावर सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास केली. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलिसांचे डीबी पथक लिहिगाव मार्गावर गस्तीवर फिरत असताना जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे महालगाव ते लिहिगाव मार्गावरील कल्याणी राइस मिल समोरील रस्त्यावर नाकाबंदी केली. कामठीकडे येत असलेले दहा चाकी कंटेनरला थांबविले असता ट्रकचालक व इतर दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शिताफीने या तिन्ही आरोपीला ताब्यात घेत यश मिळविले. ट्रकमधील निर्दयतेने बांधून ठेवलेले व कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत असलेले 25 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिले. पोलिसांनी दहाचाकी ट्रक व 25 गोवंश जनावरे असे एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शेख बब्बू शेख मुसा (वय 34, रा. यशोधरानगर, नागपूर), अजहर कमाल बेग (वय 22), हौसलाल लालाजी उईके (वय 50,दोन्ही रा.गाव चंगेरा जिल्हा गोंदिया) यांना अटक केली आहे. जनावरे तस्करी फरीद साहब व इतर साथीदार यांच्या सांगण्यावरून होत असल्याच्या माहितीवरून हे मुख्य आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत. ही कारवाई डीसीपी निलोत्पल, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेश परदेसी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर यांच्या मार्गदर्शनार्थ पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सूरज भारती, सतीश ठाकूर, सुधीर कनोजिया यांनी केली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for transporting cattle