esakal | ...आणि ते तीन पोलिस कर्मचारीच झाले जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

accident

यवतमाळ जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जामिनावर सोडण्यात येत आहे. त्यांना पुसद येथे पोहचवून पोलिस व्हॅन यवतमाळकडे परत येत होती. दरम्यान नागपूर वरून सोलापूरकडे पोहे घेऊन जात असलेल्या आयशर वाहनाने तरोडा-मंगरूळ चौपदरीकरण रस्त्यावर समोरासमोर धडक दिली.

...आणि ते तीन पोलिस कर्मचारीच झाले जखमी

sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (यवतमाळ) : कारागृहातील कैद्यांना पुसद येथे पोहचवून यवतमाळकडे परत येणार्‍या पोलिस व्हॅनला भरधाव वेगातील आयशरने दिलेल्या धडकेत वाहन पलटी झाले. या अपघातात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.सात) रात्री एक वाजता दरम्यान नागपूर-तुळजापूर महामार्गावरील तरोडा मंगरूळ येथील चौपदरीकरण रस्त्यावर घडली.
चालक सुनील केतगीर, मुस्ताक पठाण, हरिश भावेकर, अशी जखमी पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत. यवतमाळ जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जामिनावर सोडण्यात येत आहे. त्यांना पुसद येथे पोहचवून पोलिस व्हॅन यवतमाळकडे परत येत होती. दरम्यान नागपूर वरून सोलापूरकडे पोहे घेऊन जात असलेल्या आयशर वाहनाने तरोडा-मंगरूळ चौपदरीकरण रस्त्यावर समोरासमोर धडक दिली.

यात पोलिस व्हॅन रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने अपघातात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा~ उपराजधानीत कोरोनाचा पहिला बळी

राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय शिंदे, जयंत ब्राह्मणकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, पोलिस व्हॅनच्या केबिनचा चुराडा झाला.

loading image