"त्याला' हटविण्यासाठी तीन क्रेनची घ्यावी लागली मदत 

containe
containe

नेर (जि. यवतमाळ)  : दोन दिवसांपूर्वी सिमेंट वाहून नेणाऱ्या कंटेनरला यवतमाळ ते अमरावती राज्य मार्गावरील ढुमनापूरजवळ अपघात होऊन तो मार्गावरच उलटला होता. या कंटेनरला शुक्रवारी सकाळी तीन क्रेनच्या मदतीने मार्गावरून हटविण्यात आले. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. 

घटनास्थळाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

अमरावती ते यवतमाळ राज्य मार्गावरील ढुमनापूरजवळ दोन दिवसांपूर्वी सिमेंट वाहून नेणाऱ्या कंटेनरचा (एम. एच. 34 बी.जी. 7759) अज्ञात वाहनासोबत अपघात झाला होता. यामध्ये कंटेनर रस्त्याच्या मध्ये पलटला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास या अपघातग्रस्त कंटेनरला तेथून हटविण्यासाठी तीन क्रेन आणल्या गेल्या. क्रेनद्वारे कंटेनर मार्गावरून बाजूला करण्याला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. दुपारी 1 वाजता कंटेनरला मार्गावरून हटविण्यात यश आले. तोपर्यंत मार्गावर घटनास्थळाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळची वेळ असल्याने कार्यालयीन कामासाठी जाणारे नागरिक, कर्मचारी, अधिकारी आणि इतर प्रवाशांना याचा फटका बसला. विशेष म्हणजे, यावेळी एकही वाहतूक पोलीस शिपाई तिथे उपस्थित नव्हता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com