स्कॉर्पियोच्या अपघातात तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

वणी येथे आज रविवारी स्कॉर्पियोचा भीषण अपघात झाला. त्यात एक महिला, एक मुलगी व एका पुरुष जागीच ठार झाले. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांमध्ये प्रशांत खाडे (वय २४), शशिकला कुबडे (वय ४८), प्रमिला रामकृष्ण आस्वले (वय ४५, सर्व रा. जैन ले-आउट, वणी) यांचा समावेश आहे.
 

वणी(यवतमाळ)- येथे आज रविवारी स्कॉर्पियोचा भीषण अपघात झाला. त्यात एक महिला, एक मुलगी व एका पुरुष जागीच ठार झाले. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांमध्ये प्रशांत खाडे (वय २४), शशिकला कुबडे (वय ४८), प्रमिला रामकृष्ण आस्वले (वय ४५, सर्व रा. जैन ले-आउट, वणी) यांचा समावेश आहे.

वणी येथील एका लग्नाला ही मंडळी जात होती. गाडीचा वेगही खूप जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहनाला ट्रकचा कट लागून हे वाहन रोडदुभाजकावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वणी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला चंद्रपूर येथे दाखल केले आहे.

Web Title: Three died in Scorpio accident