नापिकीमुळे तीन शेतकऱ्यांनी घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

नागपूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुन्हा विदर्भातील तीन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे पीक वाहून गेल्याने समुद्रपूर तालुक्‍यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
समुद्रपूर (जि. वर्धा) येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये 19 वर्षीय तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी (ता. 12) सायंकाळी पाच वाजतादरम्यान ही घटना उघडकीस आली. हर्षल चंद्रकांत देवतळे, असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

हर्षल देवतळे याच्याकडे आजोबांच्या नावे सहा एकर शेती आहे. हर्षल शेतात काम करून रोजमजुरीचेही काम करायचा. आजोबांनी 2017 मध्ये बॅंक ऑफ इंडियाचे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेत कर्ज माफ होईल, असे त्यांना वाटले. अद्याप कर्ज माफ झाले नाही. 10 दिवसांच्या संततधार पावसामुळे वाघाडी नदीला आलेल्या पुरामुळे पिके धोक्‍यात आली होती. मक्‍त्याने केलेल्या शेतातील पिकेही धोक्‍यात होती. मागील पाच वर्षांपासून शेतात सतत नापिकी होत होती.
राबराब राबूनही हाती काहीच पीक येत नसल्याने तो व त्याचे कुटुंब विवंचनेत होते. वडिलांच्या डोक्‍यावरील कर्ज आपल्याला फेडताही येत नसल्याची त्याला खंत होती. याच विवंचनेत सोमवारी शेतात काम करून तो घरी आला.
यानंतर तो घराशेजारील गोठ्यात गेला. गोठ्याच्या छतावरील फाट्याला दोर बांधून त्याने गळफास घेतला. त्याचा भाऊ प्रज्वल गायींना पाणी पाजण्यास गेला असता त्याला हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three farmers got sacked because of napiki