दुचाकीवरील तीन मित्रांसोबत घडले हे अन्‌ चिखली गाव बुडाले शोकसागरात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

एकाच दुचाकीने चिखलीच्या दोन भावांसह मित्राला प्रवास करणे महागात पडले. भरधाव शिवशाही बसने तिघांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बरबडी गावाजवळ शनिवारी (ता. 14) दुपारी घडली. यामुले चिखली गाव शोकसागरात बुडाले.

सिंदी (जि. वर्धा) : भरधाव शिवशाही बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर गंभीर जखमी युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील बरबडी गावाजवळ शनिवारी (ता. 14) दुपारी हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन भावांचा समावेश असून तिघेही मित्र होते.

रोशन अरुण भोयर (वय 26), अशोक देवाजी तालवटकर (वय 26), नितीन देवाजी तालवटकर (वय 24) सर्व रा. चिखली, अशी मृतांची नावे आहेत. नागपूर येथून समुद्रपूर तालुक्‍यातील चिखली येथे राहणारे दोन भाऊ आणि एक मित्र एमएच 34-एसी 4176 या क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे येत होते.

शिवशाहीने दिली धडक

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर बरबडीगावाजवळ एमएच 06-ईडब्ल्यू 3638 या क्रमांकाच्या नागपूर-अहेरी शिवशाही सुपर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वार रोशन भोयर आणि अशोक तालवटकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला; तर नितीन तालवटकर हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

जाणून घ्या : मित्र मित्राच्या मदतीने सतत करायचा असं, नेहमीच्या कटकटीला कंटाळून केले हे...

चिखली गावावर शोककळा

एकाच गावातील दोन भाऊ आणि एका मित्रावर काळाने झडप घातल्याने चिखली गावावर शोककळा पसरली आहे. सिंदी पोलिसात या गुन्हाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three friends died road accident at wardha