File photo
File photo

वाहन उलटल्याने तीन देवीभक्तांचा मृत्यू

नागपूर : देवी विसर्जन करून घरी परतत असताना पिकअप बोलेरो वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन उलटून झालेल्या अपघातात चालकासह तीन देवीभक्‍तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहा युवक गंभीर जखमी असून जीवनमृत्यूशी संघर्ष करीत आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री विहीरगावजवळील सूर्योदय कॉलेजसमोर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वरमधील खरबी चौकात सार्वजनिक देवी महोत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळाने मोठ्या देखाव्यासह मोठी देवीची मूर्तीची स्थापना केली. दसऱ्याच्या दिवशी मध्यरात्रीला देवी विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते बोलेरो पिक अप वाहनाने (एमएच 31, डीएस-975) उमरेड मार्गावरील सुरगाव येथे गेले होते. वाजतगाजत देवीला निरोप दिल्यानंतर मंडळाचे जवळपास 25 सदस्य रात्री साडेबाराच्या सुमारास घरी परतत होते. विहिरगावजवळील सूर्योदय कॉलेजसमोर वळण घेत असताना वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. या अपघातात महेश किशोर सोनटक्‍के (वय 17, रा. मानसी ले-आउट), शंकर विनोद धुर्वे (वय 18) आणि चालक मंगेश नानोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रवी सोनवणे (वय 35), किशोर सोनटक्‍के (वय 35), बाबूसिंग बैस (वय 50), संदीप उईके (वय 18), दीपक उईके (वय 35) आणि निकेश उईके (वय 19) हे सहा जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच तेथून जाणाऱ्या वाहनचालकांनी लगेच धाव घेत पोलिसांना कळविले. माहिती मिळताच हुडकेश्‍वरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीप भोसले ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमींना तातडीने रूग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी फिर्यादी नरेंद्र भोजराज ढोमणे (वय 35, मानसी ले-आउट) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. रूग्णालयात भरती करण्यात आलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com