फुलसांवगी आरोग्य केंद्रात फुलले जीव; कोरोना काळातही ३०२ मातांची प्रसूती

Three hundred and two mothers gave birth during the Corona period
Three hundred and two mothers gave birth during the Corona period

यवतमाळ : सर्वत्र कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडालेली आहे. त्यात नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचाराला कोरोना संसर्गामुळे दुय्यम स्थान देत असताना फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांने ३०२ प्रसूती केली आहे.

मागील कित्येक वर्षांपासून फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात वार्षिक सरासरी पाचशे ते सहाशे प्रसूती होते. प्राथमिक आरोग्य केंद्राने सेवेबाबत संवेदनशील राहून नागरिकांना आवश्‍यक आरोग्य सेवा दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या २७ गावांमध्ये आरोग्य सेवेला व्रत समजून येथील आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी बजावली. कोरोना महामारीच्या काळामध्ये माता व मृत्यूचे प्रमाणदेखील कमी केले आहे.

फुलसावंगी येथील आरोग्य केद्रामध्ये मार्च ते सप्टेंबर २०२० या काळात ३०२ महिलांची प्रसूती झाली आहे. यात १४६ मुले व १५६ मुलींचा जन्म झाला आहे. आरोग्य व्यवस्थेमुळे एकही माता, शिशू यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला नाही. जननी सुरक्षा कार्यक्रमअंतर्गत माता व बालक दोन्ही आरोग्यक्षम असावेत, यासाठी सर्व तपासणी व उपचार मोफत केली जात आहे.

फुलसावंगी येथे डॉ. अश्‍वघोष गायकवाड, डॉ. वैभव नखाते कोविड व नॉन कोविड आजारावर काम करीत आहे. मागील महिन्यात दोन पैकी एक वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आले होते. यासोबतच नीता पाटील, रविना भटकर या आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदानही महत्वाचे आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू आहे.

जिल्ह्याचे उदाहरण राज्यात दिसावे

फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे जिल्ह्याचे उदाहरण राज्यभरात दिसावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसे काम करावे, असे आवाहन राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे डॉ. विजय आकोलकर, डॉ. संघर्ष राठोड यांनी केले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com