घर कोसळून तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

राजेदहेगाव येथील पोलिस पाटील मधुकर ढोबळे यांचे शेतीच्या कामासाठी वार्षिक रोजंदारीवर काम करीत असणारे सुकरू दामाजी खंडाते, रा. निलज खंडाळा ता. पारशिवनी हे कुटुंबासह नारायण ढोबळे यांचे घरी भाड्याने राहत होते.
 
जवाहरनगर : येथून जवळच असलेल्या राजेदहेगाव येथे घर कोसळल्याने ढिगाऱ्या खाली दबून तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी, रात्रीच्या सुमारास घडली. 

राजेदहेगाव येथील पोलिस पाटील मधुकर ढोबळे यांचे शेतीच्या कामासाठी वार्षिक रोजंदारीवर काम करीत असणारे सुकरू दामाजी खंडाते, रा. निलज खंडाळा ता. पारशिवनी हे कुटुंबासह नारायण ढोबळे यांचे घरी भाड्याने राहत होते.

रात्री गाढ झोपेत असताना पावसामुळे घराचे छत कोसळले. यात ढिगाऱ्याखाली दबून सुकरू खंडाते, ,पत्नी सारीका व मुलगी नंदीनीचा जागीच मृत्यू झाला. आज, सकाळी घटनेची माहिती होताच गावकर्‍यांनी जवाहरनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.

Web Title: Three killed in house collapse