भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून तीन ठार; दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून तीन ठार; दोघे जखमी

भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून तीन ठार; दोघे जखमी

मोहाडी (जि. भंडारा) : तालुक्यातील खमारी बुज. येथे शेतात काम करीत असताना अचानक वीज कोसळून तिघांचा मृत्यू (Three killed in accident) झाला. अनिता फत्तू सव्वालाखे (वय ४०), आशा संपत दमाहे (वय ४२) व अशोक फिरतलाल उपराडे (वय ४६) अशी मृतांची नावे आहेत. (Three-killed-in-accident-in-Bhandara-district)

सध्या शेतीचा हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे शिवारात शेतकरी व मजूर दिसत आहेत. मंगळवारी खमारी बुज. येथील रतिराम उपराडे व अशोक उपराडे आपापल्या शेतात मजुरांसोबत काम करीत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास परिसरात ढगांच्या गडगडाटांसह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतात काम करणारे सर्व जण आंब्याच्या झाडाखाली पावसापासून बचाव करण्यास गेले.

हेही वाचा: जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

याचवेळी झाडावर वीज कोसळली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अनिता फत्तू सव्वालाखे (वय ४०), आशा संपत दमाहे (वय ४२) आणि अशोक फिरतलाल उपराडे (वय ४६) यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत असलेले रतिराम उपराडे (वय ५०) व पल्लवी रतिराम उपराडे (वय १९) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मोहाडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

गोंदियात पावसाच्या सरी

दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत हजेरी लावली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरात धो-धो पाऊस पडला. तिरोडा, देवरी, आमगाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. सडक अर्जुनी, सालेकसा तालुक्यांत तुरळक पाऊस पडला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, मशगतीच्या कामाला गती आली आहे.

हेही वाचा: प्रियकराच्या भेटीसाठी रचले अपहरण नाट्य; अनैतिक संबंधाचा कळस

यवतमाळात उडाली दाणादाण

यंदा पावसाची सुरुवात दमदार राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जून महिन्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह धुवाधार पावसाला सुरुवात झाली. मृगाचा पेरणीयोग्य पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी मशागत करणाऱ्‍या शेतकऱ्‍यांच्या आशा नव्याने पल्लवीत झाल्या आहेत. पावसामुळे बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली.

(Three-killed-in-accident-in-Bhandara-district)

loading image
go to top