दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

चंद्रपूर : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. 2) रात्री साडेबाराच्या सुमारास चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावरील आरटीओ पासिंग सेंटरजवळ घडली. मनोज सुधा चाफले (वय 50, रा. हनुमाननगर, तुकूम), अपलेश कवडू खोब्रागडे ( वय 20, रा. मूल), चेतन विनोद कुमरे (19, रा. बाबानगर, बाबूपेठ) अशी मृतांची नावे आहेत.

मनोज चाफले वेकोलिच्या सास्ती कोळसा खाणीत नोकरीला आहेत. ते ड्युटी करून रात्री दुचाकीने (क्रमांक एमएच 34 / वीए 5554) चंद्रपूरकडे येत होते; तर अल्पेश व चेतन हे दुचाकीने (क्र. एमएच 34 वी 3818) बंगाली कॅम्पकडून बाबूपेठकडे जात होते. दरम्यान, डम्पिंग यार्ड पुढे काही अंतरावर आरटीओ पासिंग सेंटरच्या वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात धडकेत तिघेही गंभीर जखमी होऊन दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला;
तर एकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक ठाकरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपास सुरू केला.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in two-wheeler collision