
अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरातील एका पॉश हॉटेलच्या लॉनवर उमेदवाराच्या प्रचार सभेत नियमांचे उल्लंघन करीत साडेसातशे अधिक लोक उपस्थित राहिले. मात्र, आता प्रशासनाने याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकांनाच साडेतीन लाखांचा दंड ठोठावला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून शहरातील अन्य मंगल कार्यालये, लॉन्स चालकांना सुद्धा इशारा देण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, लग्न समारंभाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही सध्या शहरात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नेते मंडळींचे मेळावे घेण्यात येत आहेत.
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या हॉटेलच्या लॉनवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत त्या मेळाव्यात 700 लोक हजर असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रतिव्यक्ती 500 रुपये याप्रमाणे तीन लाख 50 हजार रुपयांचा दंड संबंधित संचालकांना ठोठावण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. दंडाची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेकडे देण्यात आली आहे. शहरात प्रथमच एका हॉटेल संचालकांना जबर दंड ठोठावण्यात आला असून अन्य मंगल कार्यालय तसेच सभागृह चालकांना हा इशाराच मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.