सालईमेंढ्यात तिघांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नागपूर/हिंगणा - सालईमेंढा तलावात शहरातील चमारपुरातील तिघांचा रविवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला. मैत्री दिन साजरा करण्यास गेलेल्या दहा जणांपैकी सागर सुरेश जांभूळकर (वय 17 ), बंटी प्रेमलाल निर्मल (वय 15 ), प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धार्थ सिडाम (वय 17) या तिघांवर काळाने घाला घातला. चमारपुऱ्यातील मृत सागरच्या घरी सर्व मित्र एकत्र आले. घरी या मित्रांनी मैत्री दिनानिमित्त आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दुपारी सर्वच जण तेलगावनजीकच्या सालईमेंढा तलाव परिसरात गेले. यातील तिघांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही.
Web Title: three people death by drown

टॅग्स