ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघे जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

नागभीड तालुक्यातील नवखळा-ब्राह्मणी मार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघात आज (ता.01) सायंकाळी 4 च्या सुमाराला घडला. यात तीन जण जागीच ठार झाले.
 

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील नवखळा-ब्राह्मणी मार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघात आज (ता.01) सायंकाळी 4 च्या सुमाराला घडला. यात तीन जण जागीच ठार झाले.

शुभम पुंडलिक बागडे (वय 20), शिल्पा प्रदीप मोटघरे (35) आणि संजय आसाराम शेंडे (वय 35) अशी मृतकाची नावे आहे. ते भंडार जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील रहिवासी होते.

वातावरील आयुर्वेदीक औषधी घेण्यासाठी ते नागभीड तालुक्यात आले होते. मात्र नवखळा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. हे तिघेही एकाच दुचाकीवर स्वार होते.

Web Title: Three People killed truck Accident