सहस्रकुंड धबधब्यात तीन विद्यार्थी बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील सहस्रकुंड धबधबा बघण्यासाठी आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून आलेले तीन विद्यार्थी नदीच्या प्रवाहात वाहून गेले. मुरली गावाजवळील बंधाऱ्यातून अचानक पाणी सोडल्यामुळे ही घटना घडली. दरम्यान, एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. 

रफियोद्दीन (वय 27), अकरम खान (वय 27), सोहेल खान (वय 28, सर्व रा. हैदराबाद) अशी वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हैदराबाद येथील आठ महाविद्यालयीन विद्यार्थी मंगळवारी सकाळी सहस्रकुंड धबधब्यावर पोहोचले. धबधब्यामध्ये पाणी कमी असल्याने विद्यार्थी धबधब्यात खाली उतरले. मात्र, त्याचवेळी मुरली गावालगत असलेल्या मोठ्या बंधाऱ्यातील पाणी सोडण्यात आले. यावेळी आपत्कालीन भोंगादेखील वाजविण्यात आला. मात्र, धबधब्याचा आनंद घेण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले. काही कळण्यापूर्वीच पाण्याच्या प्रवाहात तिघेही वाहून गेले. ही घटना लक्षात येताच बाळू चोपलवाड, रामलू घंटलवाड, गोविंद मागीरवाड, पांडुरंग मागीरवाड या तरुणांनी नदीम खान (वय 28) याचे प्राण वाचविले. पाण्यात वाहून गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा वृत्तलिहिस्तोवर शोध लागला नव्हता. मराठवाड्यातील इस्लामपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, मेघेवाड, पोटे यांच्यासह पोलिस कर्मचारी शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three students drown in Sahasrakund Falls