सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत खारपान पट्ट्यातील तीन गावांची बाजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पाणी फाऊंडेशन च्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत खारपान पट्ट्यातील तीन गावांनी बाजी मारली. तालुक्यातून आदिवासी गाव सालवन प्रथम क्रमांकाचे ठरले आहे.

संग्रामपूर : पाणी फाऊंडेशन च्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत खारपान पट्ट्यातील तीन गावांनी बाजी मारली. तालुक्यातून आदिवासी गाव सालवन प्रथम क्रमांकाचे ठरले आहे.

द्वितीयमध्ये काकोडा तर तृतीय मध्ये रुधाना गाव जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा निकाल 12 ऑगस्ट ला पुणे येथील कार्यक्रमातून जाहीर करण्यात आला. यावेळी आदिवासी सालवन चे रेमु डावर आणि शांताबाई यांनी मुख्यमंत्री सह सिने दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर, आमिरखान, किरण राव, गिरीश कुलकर्णी यांचे हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात 19 गावांनी पाणी फाऊंडेशनचे कामात सक्रिय सहभाग घेऊन पाणी जिरवण्याचे कामे श्रमदानातून मोठ्या जिद्दीने करण्यात आले. या स्पर्धेत तालुकास्तरावर आदिवासी सालवन या लहान गावाने प्रथम ठरले आहे. या गावातील लोकांचे परिश्रम पाहून खुद्द आमिरखान आणि किरण राव यांनी या गावाला भेट देऊन भर उन्हात श्रमदान करून ग्रामस्थांमध्ये ऊर्जा निर्माण केलीं होती. सोबतच काकोडा गावात ही ग्रामस्थांनी रात्री सुद्धा श्रमदानातून मोठमोठी कामे केली. या कामासाठी भारतीय जैन संघटनेच्या जेसीबी मशीनची खूप मोठी उभारी ठरली. शासनाने ही आर्थिक सहाय्य म्हणून दीड लाख रुपयांची डिझेलची तरतूद केली होती.

सत्यमेव जयते वॉटर कप मधील बक्षीस पात्र गावांसाठी मुख्यमंत्री रिलीफ फंडातून निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील बक्षीस वितरण कार्यक्रमातून केली. या घोषणेमुळे संग्रामपुर तालुक्यातील तीन गावांना चांगला लाभ घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.
 
जलसंधारणची उल्लेखनीय कामे करणाऱ्या वॉटर कप स्पर्धेतील तालुक्यातील तीन गावांना मुख्यमंत्री यांनी निधीसह विकास योजनांच्या कामासाठी प्राधान्य देण्याची ही घोषणा केली आहे. यामध्ये जे गाव तालुक्यातून प्रथम आलेल्या गावासाठी पाच लाख, द्वितीयसाठी पाच लाख आणि तृतीयसाठी तीन लाख असा निधी दिला जाणार आहे. यातून सदर गावामध्ये जलसंधारणाची विकास कामे गतिमान होण्यासाठी या निधीचा वापर करावा असा हेतू शासनाने ठेवला आहे. या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यात तेरा लाख रुपयांचा तीन गाव मिळून विशेष निधी प्राप्त होऊ शकेल. सोबतच या गावामध्ये गटशेतीसाठी भरघोष निधी दिला जाणार आहे. या गावामध्ये प्राधान्याने विविध विकास कामे करण्यावर नियोजन करून भर देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी भाषणातून सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three villages of Kharapan place wins the Satyamev water cup competition