गडचिरोलीत तीन महिला माओवाद्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

गडचिरोली - छत्तीसगड व गडचिरोली पोलिस गोपनीय माहितीच्या आधारे सॅन्ड्रा गावाजवळील जंगल परिसरात संयुक्‍त माओवादीविरोधी अभियान राबवीत असताना तीन जहाल महिला माओवाद्यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे तिन्ही महिला माओवादी छत्तीसगड राज्यातील आहेत. 

पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सॅन्ड्रा गावाजवळ अभियान राबवीत असताना काही महिला पळून जाताना दिसल्या. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्या माओवाद्यांच्या दलममध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांमध्ये मैनी ऊर्फ जिमो उंगा लाती (वय 32, रा. पालनार, ता. जि. बिजापूर), सरिता ऊर्फ मुळे कट्टा मडकाम (वय 23, रा. कोठमेठ्ठा, ता. जि. बिजापूर), पाकली ऊर्फ कारी बुधू गडे (वय 28, रा. दुपाळ परसेगड, ता. जि. बिजापूर) यांचा समावेश आहे. 

मैनी लाती 2003 पासून, सरिता मडकाम 2013 पासून, तर पाकली गडे 2012 पासून सॅन्ड्रा दलममध्ये कार्यरत आहे. या तीनही महिला माओवाद्यांनी आतापर्यंत अनेक चकमकींमध्ये सहभाग घेतला असून, जाळपोळ, भूसुरुंग स्फोट, खून आदी घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे. 

Web Title: Three women Maoists arrested in Gadchiroli