Crime News : समृद्धी महामार्गावर विनाकारण दगडफेक! तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

Crime News
Crime News

कारंजा : येथील समृद्धी महामार्गावर १७ जून रोजी नागपूर ते पुणे विदर्भ ट्रॅव्हल्स प्रवासी घेवुन जात असताना कारंजा टोल पासून काही अंतरावर रात्री अंदाजे पावणे बारा वाजता दरम्यान ओव्हर ब्रिज वरून काही अज्ञात लोकांनी लक्झरी बस वर दगड फेकून मारले होते. या प्रकरणात कारंजा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

Crime News
Uniform Civil Code: समान नागरी कायद्याला पाठिंबा पण...; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दाखवला आरसा

अज्ञात लोकांनी लक्झरी बसवर दगड मारल्यामुळे बसची काच फुटली व बस मध्ये बसून असलेला प्रवासी दयाराम हरी राठोड रा. चिखली ता. दारव्हा जि. यवतमाळ यांच्या कानाजवळ दगड लागल्याने जखमी झाले होते. सदर गुन्ह्याचे तपासात विशेष तपास पथक नेमून समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूच्या परिसरात गुप्त बातमीदाराकडून माहिती घेण्यात आली.

Crime News
Uniform Civil Code: समान नागरी कायद्याला पाठिंबा पण...; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दाखवला आरसा

आजूबाजूच्या गावात अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात आला. तसेच नागपूर औरंगाबाद हायवे वरील ढाब्यावरील सि.सि.टी.ही फुटेज तपासून संशयित आरोपी शुभम दशरथ हांडे (वय २३ वर्ष रा. पिंपळगाव हांडे), राम दिगांबर हांडे (वय २० वर्ष ३) व माधव गजानन वाळके (वय २३ वर्ष दोन्ही रा. किनखेड) यांना ताब्यात घेवुन कसून विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याचे मान्य केले.

आरोपींनी १७ जून रोजी ढाब्यावर जेवन करून त्यांचे गावी परत जात असताना समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनातील लोकांना गंभीर जखमी करण्याचे उद्देशाने ओव्हर ब्रिज वरून समृद्धी महामार्गावरून दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com