esakal | वाघ अस्वलाला घाबरला, पाहा ताडोबातील व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

tiger-bear video

वाघ अस्वलाला घाबरला, पाहा ताडोबातील व्हिडिओ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : वाघ (tiger) हा नेहमी जंगलातील इतर प्राण्यांवर हल्ला करत असतो. तसेच वाघाच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडतात. मात्र, सध्या एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये वाघ आणि अस्वल दोन्ही दिसत आहेत. अस्वल समोर येताच वाघ घाबरून खाली बसतो असे या व्हिडिओमधून दिसत आहे. चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील (tadoba tiger reserve chandrapur) हा व्हिडिओ आहे.

हेही वाचा: वाघ पाहायचेत, ताडोबाला भेट द्या!

चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रकल्पात नेहमीच वाघाचे दर्शन होत असते. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक ताडोबाला भेट देतात. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वाघ त्यांना दर्शन देखील देतो. याच परिसरात वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याच्या घटना जवळपास दररोज घडतात. पण, आक्रमक असणाऱ्या वाघाने मात्र अस्वालासमोर शरणागती पत्करली असल्याचे दिसतेय. कारण, अस्वल हा देखील आक्रमक प्राणी आहे. अस्वला कोणत्या प्राण्यावर किंवा माणसावर हल्ला करून त्यांना अक्षरशः फोडून काढतो. त्यामुळे हे आक्रमक अस्वल पुढे दिसताच वाघ चक्क घाबरून खाली बसला आणि त्याने वाघासमोर शरणागती पत्करली. पर्यटकांच्या आवाज येताच अस्वलाने जंगलात धूम ठोकली. त्यानंतर घाबरलेला वाघ परत मार्गस्थ झाला. हे सर्व दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केले.

loading image
go to top