फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; जागीच ठार

नागरिकांनी नरभक्षक वाघाचा जोवर बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका घेतली
Tiger attack
Tiger attackTiger attack

पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : तालुक्यात काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. कसरगट्टा येथे कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची (woman dead) घटना ताजी असतानाच सकाळी फिरायला गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोंभुर्णा-वेळवा मार्गावर घडली. संध्या विलास बावणे (वय ३५ रा. वेळवा) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नरभक्षक वाघाचा जोवर बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोंभुर्णा- वेळवा मार्गावर वाघाचा वावर महिनाभरापासून सुरू आहे. या परिसरातील अनेक नागरिकांना रस्त्यावर वाघाचे दर्शन झाले आहे. गुरुवारी सकाळी वेळवा येथील संध्या विलास बावणे या फिरायला गेल्या होत्या. डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार (woman dead) केले. महिलेवर हल्ला (Tiger attack) झाला त्याचवेळी फिरायला आलेल्या मुलांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत वाघाने महिलेस ठार केले होते.

Tiger attack
एकमेकांच्या मिठीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या; विषारी औषध घेतले

घटनेची माहिती मिळताच वेळवा आणि परिसरातील गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोंभुर्णा पोलिस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे बराचकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तब्बल ८ तास मृतदेह तसाच (The role of not picking up bodies) होता. वनविभागाने नागरिकांचा रोष लक्षात घेता मृताच्या कुटुंबाला तत्काळ मदत म्हणून ५ लाख रुपये आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी वनविभाग, पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tiger attack
मानलेले बहीण-भाऊच पडले एकमेकांच्या प्रेमात; अन्...

आणखी किती बळी

याच वर्षी मार्चमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केले. मागील महिन्यात कसरगट्टा येथील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना घडली. दुचाकीने जाणाऱ्या युवकाला रस्त्यावरून फरफटत जंगलात नेले व गंभीर जखमी केले. अशा घटना घडत असताना वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वाघावर पाळत ठेवण्यासाठी कसरगट्टा येथे शेतशिवारात ११ कॅमेरे बसविण्यात आले. कर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. मात्र, आता वाघाने आपला मोर्चा वेळवा-पोंभुर्णा मार्गाकडे वळविला आहे.

शेतमजूर घराकडे परतले

वेळवा, आष्टा, पोंभुर्णा मार्गावर अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. शेतात शेतमाल असून कापूस, मिरची तोडण्याचा हंगाम सुरू आहे. आज घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे शेतमजुरांत भीतीचे वातावरण पसरले असून ते आपल्या गावाकडे परतले. त्यामुळे आता कापूस, मिरची तोडणीची कामे बंद राहणार आहेत. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com