वाघाच्या हल्ल्यात महिला ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

चंद्रपूर - जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. 30) सकाळच्या सुमारास घडली. ताराबाई तावाडे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. 

चंद्रपूर - जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी (ता. 30) सकाळच्या सुमारास घडली. ताराबाई तावाडे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. 

चिचपल्लीजवळ दाबगाव हे गाव आहे. दाबगाव ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाला लागूनच आहे. या भागातील बहुतांश महिला मोहफुले वेचण्यासाठी जंगलात जातात. ताराबाई तावाडे या काही महिलांसोबत गुरुवारी सकाळी चिचपल्ली एफडीसीएमच्या कम्पार्टमेंट क्रमांक 156 परिसरात मोहफुले वेचत होत्या. तेव्हाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वाघाने त्यांना ठार मारले. या घटनेनंतर आजूबाजूला मोहफुले वेचणाऱ्या महिलांनी गावाकडे धाव घेतली. गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली. वन विभागाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गेल्या आठवड्यात नागभीड तालुक्‍यातील लोहारा येथील जंगलातही वाघाने महिलेस ठार केले होते. 

Web Title: Tiger attacked women killed