शोध "मयूरी"चा, मिळाले नीलगाईचे पाय; वाघिणीचा शोध; वहाणगाव शिवारात नीलगाईची शिकार

tiger is disappear from buffer zone in Chandrapur
tiger is disappear from buffer zone in Chandrapur

चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पअंतर्गत येणाऱ्या खडसंगी बफर झोन क्षेत्रातून बछड्यापासून मयूरी वाघीण बेपत्ता झाली आहे. त्यामुळे मागील नऊ दिवसापासून बेपत्ता वाघिणीचा शोध खडसंगी बफर झोनचे वन कर्मचारी शोध घेत आहेत. बुधवारी शोध मोहिमेदरम्यान वहानगाव शेतशिवारातील एका शेतात नीलगाईचे पाय मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्‍याअंतर्गत येणाऱ्या वाहनगाव शेतशिवारात वनविभागाचे पथक मयूरी वाघिणीचा शोध घेत असताना या शेतातून वनकर्मचाऱ्यांनी नीलगाईचे चार पाय जप्त केले आहे. ताडोबा बफर झोनमध्ये वाघिणीच्या शोधासाठी मागील आठ दिवसांपासून वनकर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. वनविभागाच्या 12 कर्मचाऱ्यांचे एक पथक जंगल परिसर, नदी-नाले, शेतशिवार पिंजून काढत आहेत. 

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सदर वनकर्मचारी वहानगाव शेतशिवारात शोधमोहिमेवर असताना वहानगाव येथील शेतकरी पेंदाम यांच्या शेतात कापसाची लागवड करण्यात आलेल्या शेतात रात्री 8 वाजताच्या दरम्यान नीलगायीचे पाय आढळून आले.

सदर जंगल परिसर हा प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारित येत असून, पेंदाम नामक शेतमालक चंद्रपूरला राहतात. त्यांची ही शेती श्‍यामराव वाकडे या शेतकऱ्याने भाड्याने घेतली आहे. पेंदाम यांच्या मालकीच्या या शेतशिवारात ही घटना समोर आल्याने वनपरिक्षेत्राधिकारी भाविक चिवंडे यांनी खडसंगीचे क्षेत्र सहाय्यक घुगरे यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. यावेळी शेतात कोणत्याही विजेच्या तारा आढळून आल्या नाही. 

विजेच्या धक्‍क्‍याने नीलगाईचा मृत्यू झाला असता, तर घटनास्थळी पूर्ण अवयव असते. परंतु, केवळ पाय आढळून आल्याने नीलगाईची शिकारच झाली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. नीलगाईचे पाय हे कापसाच्या पिकात लपवून ठेवण्यात आले होते. दरम्यान, वनविभागाने पंचनामा करून चारही पाय जप्त केले. याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी भाविक चिवंडे यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचारी करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com