esakal | वाघ दिसताच ‘तो’ चढला झाडावर; मग... | Fear Among Farmers
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

वाघ दिसताच ‘तो’ चढला झाडावर; मग...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील मारेगाव (को) शिवारात सोमवारी (ता. २७) सकाळी अकरा वाजताच्या सुमारस एका तरुणाला वाघ दिसला. काही काळ त्याला काहीच सुचले नाही. शेवटी त्याने जीव वाचविण्यासही झाडाचा आसरा घेतला. वाघ दिसल्याची चर्चा पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील रासा, मारेगाव, सुकनेगाव परिसरात वाघाचा वावर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका बैलावर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. तर नवरगाव येथील शेतकऱ्याची कालवड वाघाने ठार केली होती. वाघाचा वावर परिसरात असल्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा: चक्क डॉन सफेलकरच्या बायकोशी मैत्री; अन् घडला थरारक हत्याकांड

मारेगाव (को) येथील विशाल ठाकरे हा सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात जाण्यासाठी निघाला. त्याच्या शेतालगत झुडपे जंगल आहे. विशाल शेतात जात असताना वाघ बसलेला दिसला. वाघ पाहून तो घाबरला व झाडावर चढला. तो झाडावर चढल्याचे पाहून बऱ्याच वेळ वाघही झाडाच्या अवती भवती फिरत होता.

विशालने मित्रांना व परिसरातील शेतात काम करणाऱ्यांना फोन करून याबाबत माहिती दिली. सर्वांनी शेताकडे धाव घेतल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली. ती वाघीण असल्याचे सांगितले जाते. तिच्यासोबत दोन बछडे असण्याची शक्यता आहे. वाघिणीच्या पावलांच्या खुणासोबतच बछड्यांच्याही पावलांचे ठसे आढळून आलेले आहेत. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा लावण्यात आला आहे.

loading image
go to top