वाघ आढळला मृतावस्थेत

अमरावती : मोथा येथे मृतावस्थेत आढळलेल्या वाघाला अग्नी देताना वनविभागाचे कर्मचारी.
अमरावती : मोथा येथे मृतावस्थेत आढळलेल्या वाघाला अग्नी देताना वनविभागाचे कर्मचारी.

अमरावती/चिखलदरा : चिखलदरा तालुक्‍यातील मोथा येथील नवीन पवनचक्कीच्या बाजूला जंगलात वाघाचा मृतदेह शनिवारी (ता. पाच) आढळला. या वाघाचा मृत्यू घातपाताने झाल्याची शक्‍यता वनविभागाचे अधिकारी पडताळून पाहत आहेत. वाघ शिकारप्रकरणात चौघे वनविभागाच्या ताब्यात असताना ही घटना घडली.
त्यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारप्रकरणात धारणी, चिखलदरा तालुक्‍यातील स्थानिक लोकांसह अन्य काही यंत्रणाही पोलिसांच्या तपासांत सहकार्य करीत आहेत. हा वाघ आठवड्यापूर्वी मृत्युमुखी पडल्याची शक्‍यता आहे. त्याचे दात पडलेले होते, तर घटनास्थळी मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरली होती. मृत वाघाचे नेमके वय समजू शकलेले नाही. तीन दिवसांपूर्वीच वनविभागाच्या पथकाने धारणी तालुक्‍यातील काही जणांना अटक केली होती. सध्या ही टोळी वनकोठडीत आहे. वाघाचा मृत्यू कशामुळे झाला, हे निश्‍चित सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत वाघाचे घटनास्थळीच पडून असलेले दातही जप्त केले. शिवाय मृत वाघाची शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडल्यानंतर वनविभागाने अंत्यसंस्कार केले. वाघाच्या शरीराचे काही नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोशाळेत पाठविले जातील.
दात, नख पाठविले डीएनए तपासणीसाठी
वाघाचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असावा. तसेच त्याचे वय 12 ते 18 वर्षांचे असावे. वाघाचे आतील अवयव कुजलेले होते. वाघाचे दात व एक नख डीएनए तपासणीसाठी तसेच पोटाच्या आतील अन्न व इतर अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती चिखलदऱ्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर आढाव यांनी दिली.
विषबाधेने मृत्यूची शक्‍यता
जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन वर्षांत वाघ व बिबट शिकारीच्या बऱ्याच घटना उघडकीस आल्या. त्यामुळे तस्करीमागे अन्य काहींचा समावेश असू शकतो. मोथा येथील वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याची शक्‍यता वनविभाग पडताळून बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com