वाघाला बसविणार कृत्रिम पाय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नागपूर : ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या पळसगाव जंगलात शिकाऱ्याच्या सापळ्यात अडकून पायाची तीन बोटे निकामी झालेल्या साहेबराव नावाच्या वाघाला कृत्रिम पाय बसविण्यात येणार आहे. याकरिता आज साहेबरावच्या सर्व आवश्‍यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. हा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच केल्या जात आहे.

साहेबराव आठ वर्षांचा असून सध्या गोरेवाडा येथे आहे. सहा वर्षांपूर्वी शिकाऱ्यांनी पळसगाव जंगलात त्याच्यासाठी सापळा लावला होता. त्यात अडकल्याने साहेबरावच्या पायाची तीन बोटे निकमी झाली होती. नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान दिले होते. मात्र, पायाची बोटे निकामी झाल्याने त्याला चालताना त्रास होत होता. त्यामुळे नैसर्गिक पाय लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी त्याच्या पायाची सुश्रुत हॉस्पिटलमध्ये डॉ. शरद उपाध्ये व डॉ. सुश्रुत बाभूळकर यांनी क्ष-किरण तपासणी केली. डॉ. गौतम भोजने व डॉ. विनोद धूत यांनी रक्ताचे नमुने घेतले. यावेळी वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची चमू उपस्थित होती. यावेळी व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, प्रा. आशीष पातूरकर, डॉ. बन्नलीकर, नंदकिशोर काळे, एच. व्ही. माडभुषी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. साहेबरावला बेशुद्ध करून सर्व चाचण्या घेण्यात आल्या.

Web Title: tiger give artificial legs