यवतमाळ शहरालगत वाघाची दहशत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

यवतमाळ : शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरात सोमवारी (ता. 24) रात्री आठच्या सुमारास चौकीदाराला वाघ दिसल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन विभाग व पोलिसांनी एक तास परिसरात शोध घेतला; मात्र वाघ आढळला नाही. त्यामुले नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

औद्योगिक वसाहत परिसरातील तलावालगत असलेल्या ऊस व केळीच्या शेतात वाघ दिसल्याची चर्चा महिन्याभरापासून सुरू आहे. वन विभागाने या ठिकाणी कॅमेरे बसवून वाघाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. कर्मचारी व पथक या भागात तैनात करण्यात आले होते. मध्यंतरी वाघाची चर्चा कमी झाली होती. मात्र, सोमवारी (ता. 24) रात्री आठ वाजता एका खासगी शाळेजनीक असलेल्या कंपनीच्या परिसरात वाघ दिसला. त्यामुळे लगतच्या परिसरात एकच खळबळ उडाली. लोहारा परिसरातील बघ्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिस प्रशासन व वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोधमोहीम राबविली. एक तास चाललेल्या या मोहिमेत पर्गमार्ग आढळले; मात्र वाघ दिसला नाही. काहींच्या मते एखाद्या ठिकाणी वाघाने आश्रय घेतल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. औद्योगिक वसाहत परिसरात काम करणारे कामगार धास्तीत असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiger seen in city area