नरभक्षक वाघ मध्य प्रदेशात जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

अमरावती : धामणगावरेल्वे तालुक्‍यात दोघांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षक वाघाला मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील सारणी क्षेत्रात जेरबंद करण्यात आले. गत दहा दिवसांपासून या वाघाने दहशत निर्माण केली होती. त्याला पकडण्यासाठी दोन दिवसांपासून मेगा ऑपरेशन सुरू होते. यासाठी चार हत्ती, तीन जेसीबी, दीडशे कर्मचारी व अधिकाऱ्यांची चमू मेहनत घेत होती.

मध्य प्रदेशच्या सारणी परिसरातील कॉल हेडलीन प्लांटजवळ हा वाघ नागरिकांना दिसला. तेथील एबी टाइप कॉलनीत त्याने आपली दहशत पसरवली होती. तीन दिवसांपासून शांतिनगर परिसरात त्याने ठाण मांडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक दहशतीखाली आले होते. सदर वाघ नरभक्षक असल्याने तो येथेसुद्धा धुमाकूळ घालून माणसांवर हल्ला करू शकतो. त्यापूर्वीच त्याच्या हालचालीवर दहा दिवसांपासून एसटीआर आणि वनविभागाच्या चमूने लक्ष ठेवले होते. दोन दिवसांपासून त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवत वनविभागाने त्याला पकडण्यात यश मिळविले.
हत्तीवर बसून केले बेशुद्ध
सातपुडा टायगर रिझर्व्हचे ट्रॅंक्‍युलाईझर स्पेशालिस्ट गुरुदत्त शर्मा व डॉ. मनोज कुमार यांच्या पथकाने हत्तीवर बसून 15 मीटर अंतरावरून बंदुकीच्या माध्यमाने नरभक्षक वाघावर इंजेक्‍शन डागले. शूट केल्याबरोबर तो काही अंतरावर पळाला. परंतु, लवकरच इंजेक्‍शनचा परिणाम झाला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले.

Web Title: tiger tranquillize in mp

टॅग्स