फिरायला जाणे जिवावर बेतले; दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

पोंभुर्णा मार्गावरील बोरीच्या नाल्याजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला असून, एक जखमी झाला आहे.
ACCIDENT
ACCIDENTSAKAL

आक्सापूर : पोंभूर्णा मार्गावरील बोरीच्या नाल्याजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला असून, एक जखमी झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना १२ सप्टेंबरला संध्याकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली.

ACCIDENT
अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

रोहित रविंद्र भांडेकर वय २२ वर्ष (रा.चामोर्शी, जि.गडचिरोली) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान सहा-सात मित्र पोलिस भरतीच्या सरावासाठी चिंतलधाबा रोडकडे गेले होते. सराव करून परतत असताना चिंतलधाब्याकडून पोंभूर्ण्याकडे भरधाव येणाऱ्या (MH 34-AW 3271) या दचाकीने स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल जवळील बोरीच्या नाल्याजवळ पैदल येणाऱ्या तरूणांना जबर धडक दिली.

यात रोहित भांडेकर या २२ वर्षीय तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र शेषराव ढोले यालाही जबर मार लागला आहे. यातील भरधाव दुचाकीस्वार चालक नरेंद्र कोमलवार याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूरच्या खाजगी मेहरा हास्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे.

दुचाकीस्वार नरेंद्र मारोती कोमलवार यांचेवर पोलिस स्टेशन पोंभूर्णा अपराध क्रमांक ८९/२०-२१ कलम २७९,३३७,३३८,३०४(अ)भादवी सहकलम १८४,१३४/१७७,मोटर वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डि.एस.ओल्लालवार करीत आहेत.

चिंतलधाबा पोंभुर्णा मार्गावर मागील वर्षापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने येतात यात जंगली प्राण्यांचा हि वावर असतो त्यामुळे अपघात होतात याला आडा घालण्यासाठी चिंतलधाबा ते पोंभुर्णा या मार्गावर दर 200 मीटरवर एक गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com