खंडित वीजपुरवठ्यामुळे आज मर्यादित पाणी 

खंडित वीजपुरवठ्यामुळे आज मर्यादित पाणी 

नागपूर- महावितरणने गोधनीतील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात उद्या, १ मार्च रोजी सहा तास वीजपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेंच टप्पा चारच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरच्या जलकुंभांना पाणीपुरवठा होणार आहे. परिणामी या तिन्ही विधानसभाक्षेत्रातील अनेक वस्त्यांमध्ये उद्या कमी दाबाने व मर्यादित पाणीपुरवठा होईल. 

गोधनीतील ३३ केव्ही फीडरवर देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी महावितरणने बुधवारी सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पेंच टप्पा चार जलशुद्धीकरण केंद्रावरून शुद्ध पाण्याचे पंपिंग होणार नाही. त्यामुळे नारा, नारी, जरीपटका, धंतोली, ओंकारनगर जलकुंभ एक व दोन आणि सिव्हिल लाइन्स, श्रीनगर या जलकुंभांचा पुरवठा बाधित होईल. उत्तर नागपुरातील बोरियापुरा मुख्य जलकुंभांतर्गत येणाऱ्या लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्वार्टर, मेयो हॉस्पिटल, सैफीनगर, अन्सारनगर, डोबी, कमाल बाबा दर्गा, भगवाघर चौक, मोमिनपुरा, एमएलसी कॅंटीन, शेख बारी चौक, नाल साब चौक, काला थंडा तकिया, भानखेडा, दादरा पूल टिमकी, गोळीबार चौक, कोसारकर मोहल्ला, नंदबाजी डोह, समता बुद्धविहार, सपाटे मोहल्ला, दांदरे मोहल्ला, देवघरपूर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे, पिली मारबत, धापोडकर गल्ली, लाल दरवाजा, मुसलमानपुरा, बंगाली पंजा, मस्कासाथ इतवारी, तेलीपुरा, मिरची बाजार चौक, टांगा स्टॅंड, संभाजी कासार, ढिवरपुरा, रामनगर, बांगलादेश, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक, नारा जलकुंभांतर्गत आराधना कॉलनी, नूरी कॉलनी, आर्यनगर, ओमनगर, नारा गाव, वेलकम सोसायटी, देवीनगर, प्रीती सोसायटी, नारी/जरीपटका जलकुंभांतर्गत भीम चौक, हुडको कॉलनी, कस्तुरबानगर, मार्टिननगर, विश्‍वासनगर, खुशीनगर, सुगतनगर, कबीरनगर, कपिलनगर, सन्यालनगर, चैतन्यनगर, सहयोगनगर, राजगृहनगर, लहानुजीनगर, सिव्हिल लाइन, मरियमनगर, रवींद्रनाथ टागोर रोड, पाम रोड, धंतोली जलकुंभांतर्गत काँग्रेसनगर, तकीया स्लम, ओंकारनगर जलकुभांतर्गत अभयनगर, रहाटेनगर टोली, फुलमती ले-आउट, रामेश्‍वरी, जोगीनगर, ८५ प्लॉट, रमानगर, पार्वतीनगर, भीमनगर, जयभीमनगर, बाभूळखेडा, म्हाळगीनगर जलकुंभांतर्गत आशीर्वादनगर, रुक्‍मिणीनगर, म्हाळगीनगर, संजय गांधीनगर, महात्मा गांधीनगर, प्रेरणानगर, गजानननगर, श्रीनगर जलकुंभांतर्गत अरविंद सोसायटी, बोरकुटे ले-आउट,  मस्के ले-आउट, नरेंद्रनगर या भागात पाणीपुरवठा होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com