महापौर निवडणुकीसाठी आजपासून धावाधाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले असून उद्या, मतमोजणीनंतर तत्काळ महापौर निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया सुरू होणार आहे. 5 मार्च रोजी महापौर निवडणे आवश्‍यक असून, सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्याने प्रशासनाला वेगाने प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांचे गॅजेट नोटीफिकेशन उद्यालाच काढण्यात येणार आहे. 

नागपूर - महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले असून उद्या, मतमोजणीनंतर तत्काळ महापौर निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया सुरू होणार आहे. 5 मार्च रोजी महापौर निवडणे आवश्‍यक असून, सलग तीन दिवसांच्या सुट्या आल्याने प्रशासनाला वेगाने प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांचे गॅजेट नोटीफिकेशन उद्यालाच काढण्यात येणार आहे. 

उद्या 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणीनंतर शहरात सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीची सुटी असून, त्यानंतर चौथा शनिवार तसेच रविवार हे सलग तीन दिवस सुट्यांचे आहेत. 5 मार्च रोजी महापालिकेत महापौर निवडणे आवश्‍यक आहे. महापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांना आठ दिवसांपूर्वी कार्यक्रम घोषित करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून कामात लागलेल्या प्रशासनाचा पुन्हा कस लागणार आहे. सुट्यामुळे राज्य शासन, विभागीय आयुक्तांना निवडून आलेल्या सदस्यांची यादी सादर करण्यास विलंब होणार आहे. परिणामी महापौरांची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. 5 मार्च रोजीच महापौर निवडणूक पार पाडता यावी, यासाठी प्रशासनाने उद्या मतमोजणीनंतर तत्काळ निवडून आलेल्या सदस्यांचे गॅजेट नोटीफिकेशन काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी, 27 फेब्रुवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नोटीस काढणे शक्‍य होणार आहे. याशिवाय महापौरपद निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष तसेच अपक्षांना आघाडी करावी लागणार आहे. साधारणपणे सदस्य निवडून आल्यानंतर आघाडी करण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी असतो. परंतु, महापौर निवडणुकीनंतर आयुक्तांकडून पुढील वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करणेही वेळेत देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे स्थायी समितीची निवडही आवश्‍यक आहे. स्थायी समितीत संख्या बळाच्या आधारवर सदस्याची निवड केली जाते. त्यामुळे आघाडीसाठीही राजकीय पक्ष, अपक्षांना धावाधाव करावी लागणार आहे. 

1 मार्च रोजी महापौरपदासाठी नामांकन 
बहुमताने सत्तेत येणाऱ्या पक्षाला महापौरपदासाठी 1 मार्च रोजी नामांकन दाखल करावे लागणार आहे. 5 मार्च रोजी महापौरांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे बहुमताने येणाऱ्या पक्षालाही मतमोजणीनंतर सात दिवसांतच महापौरपदाच्या उमेदवारांची निवड करणे आवश्‍यक आहे. 

Web Title: Today for the stampede from the Mayor election