esakal | ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान, सहा तालुक्यातील उमेदवारांचे भाग्य होणार मशीनबंद
sakal

बोलून बातमी शोधा

today voting for grampanchayat election in gadchiroli

मतदान कार्यक्रमानुसार शुक्रवारी कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या सहा तालुक्‍यांत मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील.

ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान, सहा तालुक्यातील उमेदवारांचे भाग्य होणार मशीनबंद

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींपैकी प्रत्यक्ष 320 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून पहिल्या टप्प्यातील सहा तालुक्‍यांतील मतदान शुक्रवार (ता. 15) होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

मतदान कार्यक्रमानुसार शुक्रवारी कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या सहा तालुक्‍यांत मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. जिल्ह्यात 15 व 20 जानेवारी रोजी होणाऱ्या 360 ग्रामपंचायतीमधील निवडणुकांमध्ये नामनिर्देशन पत्र अंतिम करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या 320 ग्रामपंचायतींमध्ये 3098 जागांपैकी 146 ठिकाणी एकही वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्यामुळे रिक्त राहणार आहेत. नामनिर्देशन मागे घेण्याचा कालावधी संपल्यानंतर एका जागेसाठी एकच नामनिर्देशन बाकी असलेल्या 676 जागांवर बिनविरोध सदस्य निवडले जाणार आहेत, तर उर्वरित 2276 जागांसाठी जिल्ह्यात 320 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. धानोरा तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने त्या ठिकाणी मतदान होणार नाही. तसेच 20 पूर्णत: बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये गडचिरोली व कोरची तालुक्‍यात प्रत्येकी 4, सिरोंचा 3, आरमोरी, धानोरा व चामोर्शी प्रत्येकी 2, कुरखेडा, अहेरी व एटापल्ली प्रत्येकी 1 यांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतींची संख्या 18 आहे. यामध्ये कुरखेडा 3, धानोरा 10, चामोर्शी 2, मुलचेरा 2, एटापल्ली 1 यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

सुटी किंवा दोन तासांची सवलत -
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा, यासाठी शासनाकडून परिपत्रकाच्या आधारे सूचना करण्यात आली आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/ अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील, असे कळविले आहे. 
 

loading image