गणेश चौधरीच्या जामिनावर आज निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत (केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीत झालेल्या 6 कोटी 12 लाख 39 हजारांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन संचालक गणेश चौधरी यांच्या जामिनावर मंगळवारी (ता. 23) आदेश होईल.

अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत (केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीत झालेल्या 6 कोटी 12 लाख 39 हजारांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन संचालक गणेश चौधरी यांच्या जामिनावर मंगळवारी (ता. 23) आदेश होईल.
सोमवारी (ता. 22) जिल्हा न्यायाधीश व अपर सत्र न्यायाधीश निखिल पी. मेहता यांच्या न्यायालयात बचाव पक्षाचे वकील ऍड. ठाकूर व जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी तपास अधिकारी आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले व सहायक पोलिस निरीक्षक अतुल वर हजर होते. 19 जुलै रोजी पोलिसांनी चौधरीच्या जामीन अर्जानंतर न्यायालयात से दाखल केला होता. त्यानंतर न्यायाधीश मेहता यांनी चौधरीला सोमवारी (ता. 22) होणाऱ्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, गणेश चौधरी हे न्यायालयात हजर झाले नाही. त्यांच्या वकिलांनीच युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने यासंदर्भात असलेले काही महत्त्वपूर्ण दस्तऐवज न्यायालयासमोर सादर केले. बचाव पक्षाच्या वकिलांनी सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर तब्बल दीड तास तर सरकारी वकिलांनी अर्धा तास युक्तिवाद केला. न्यायाधीश मेहता यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व त्यासंदर्भात दिलेले दस्तऐवज तपासून मंगळवारी (ता. 22) जामीन अर्जासंदर्भात पुढील आदेश केले जाईल, असे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today's decision on Ganesh Chaudhary's bail