मानसिक त्रासाला कंटाळून टोलनाका कर्मचाऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

साकोली (जि. भंडारा) : येथील अशोका बिल्डकॉन कंपनीच्या टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्याने मानसिक तणावातून घरी गळफास लावून आत्महत्या केली. होमदेव पांडुरंग बावनकुळे (वय 42, रा. भिलाई) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणात टोल व्यवस्थापकाला अटक केली आहे.
होमदेव हा टोलनाक्‍यावर शिफ्ट इन्चार्ज म्हणून कार्यरत होता. तो सेंदूरवाफा येथे यशवंत झोडे यांच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत होता. मंगळवारी तो कामावर हजर झाला नाही. त्यामुळे टोलनाक्‍यावरील सहकारी त्याच्या घरी गेले. दार ठोठावले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे याबाबत साकोली पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिस कर्मचारी घटनास्थळी आल्यावर खोलीचे दार उघडले असता होमदेव गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. मृताने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना त्याच्या घरात मिळाली आहे. त्यानुसार व्यवस्थापक धीरज दीक्षित व शिफ्ट इन्चार्ज सुनील समरित यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. यानंतर पोलिसांनी व्यवस्थापक दीक्षित याला अटक केली तर, सुनील समरित हा दोन दिवसांपूर्वी तिरुपती बालाजी येथे दर्शनास केल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tollnaka employee commits suicide after suffering Mental distress