esakal | दुसऱ्याच्या नावाने कर्ज उचलून त्याने केली ऐश...मग चंद्रपुरातील व्यापाऱ्याला नागपुरातून आले फोन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुसऱ्याच्या नावाने कर्ज उचलून ऑयफोन आणि दोन एसी घेण्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला. संबंधित व्यापाऱ्याच्या कागदपत्रावर स्वतःचे छायाचित्र लावून ही कर्जचोरी करण्यात आली. यासंदर्भात रामनगर पोलिसात सुरेंद्र आसवानी यांनी तक्रार दाखल केली आहे. ते न्यायालयात जाणार आहेत. या चोरी प्रकरणाचा घटनाक्रम मोठा मजेशीर आहे.

दुसऱ्याच्या नावाने कर्ज उचलून त्याने केली ऐश...मग चंद्रपुरातील व्यापाऱ्याला नागपुरातून आले फोन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपुरातील गोल बाजारात उद्योजक सुरेंद्र आसवानी यांचे दुकान आहे. मागील पंधरा दिवसांपासून त्यांना बजाज फायनान्सच्या नागपूर कार्यालयातून फोन यायला सुरुवात झाली. तुम्ही कर्ज घेतले आहे.

कर्जाची फरतफेड लवकर करा, असे धमकीवजा निर्देश त्यांना बजाज फायनान्सकडून देण्यात येते होते. मात्र, आपण कर्ज घेतले, हेच त्यांना आठवत नव्हते.

यासंदर्भात त्यांनी कुटुंबातील सदस्यांनाही विचारणा केली. मात्र, कुणीच कर्ज घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कर्जाची फरतफेड करणार नाही, अशा शब्दांत बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावले.

बजाज फायनान्सचे अधिकारी चंद्रपुरात

मात्र, त्यांचा कर्जपरतफेडीचा ससेमिरा टळला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून कर्जाची फरतफेड करण्यासाठी बजाज फायनान्सकडून आसवानी यांच्याशी संपर्क साधला जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वतः बजाज फायनान्सचे काही अधिकारी चंद्रपूर शहरात सुरेंद्र आसवानी यांच्याकडे दाखल झाले.

अखेर अधिकाऱ्यांना झाला पश्‍चाताप

अधिकाऱ्यांनी आसवानी यांना कर्जाची कागदपत्रेही दाखविली; तेव्हा अधिकारी आणि आसवानी दोघांनाही भोवळ आली. कारण सुरेंद्र आसवानी यांचे कागदपत्रावर नाव होते. मात्र छायाचित्र दुसऱ्याच व्यक्तीचे होते. कर्ज उचलणारा दुसराच व्यक्ती होता. त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता त्या व्यक्तीला कर्ज दिल्याचा पश्‍चाताप बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यांना झाला.

असे घडलेच कसे? : दोघेही पेशाने प्राध्यापक अन्‌ सार्वजनिक ठिकाणी केले असे अशोभनीय कृत्य...

मी कर्जाची परतफेड करणार नाही

शेवटी मी कर्जाची फरतफेड करणार नाही, असे सुरेंद्र आसवानी यांनी लिहून दिले. त्यानंतर अधिकारी माघारी फिरले. आता आसवानी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. बजाज फायनान्ससुद्धा संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसांत जाणार आहे. त्यांच्यासमोर आरोपीचा चेहरा तर आहे. परंतु त्याचे खरे नाव माहीत नसल्याने बजाज फायनान्सचे अधिकारीही हतबल झाले आहेत.