तुरीचे झाले खराटे...

तुरीचे झाले खराटे...

पोरज (जि.बुलडाणा) : खामगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामात उडीद, मूग, तीळ, ज्वारी, सोयाबीनचे पीके सडून पडले. तर उरलेल्या कापूस व तूर या पिकांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उरलेल्या कापसाला मजूर वर्ग सुद्धा मजुरी जास्तच मागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. तर ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे.

कर्ज फेडायचे कसे?
तरी कृषी खात्याने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पीक पाहणी केलेली आहे. पंचनामे सादर शासनाकडे झालेले आहेत आधीपासून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी बांधवांची होती. आता पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही मदत जाहीर न झाल्यामुळे शेतकरी वर्गाच्या हाती आलेले पिके मजुरीचा खर्चही निघणे अवघड आता होऊ लागले हात उसने घेतलेले पैसे झालेले कर्ज फेडायचे कसे? या आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

रब्बी हंगामही लांबणीवर
रब्बीचा हंगाम सुद्धा लांबणीवर गेला असल्याने शेतकऱ्यांना धान्य विकत घेण्याची वेळ आली आहे व धान्य विकत घेणार तरी कुठून खरिपाचा हंगाम हातामधून गेल्याने लागलेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे बळीराजाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. शेतकरी वर्ग फार मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला खरिपाच्या पिकाची मोठी दयनीय परिस्थिती झाली आहे. 

मोठ्या आर्थिक  मदतीची गरज
80 ते 90 टक्के शेतकऱ्यांना शेतात जाण्याचे सुद्धा काम या परतीच्या पावसाने ठेवले नसून पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. हाती उरलेले तुरीचे पीक सुद्धा जास्त पाणी झाल्यामुळे जळून राहिले आहे. अशा परिस्थितीत कृषी केंद्राची, किराणा दुकानदारांची झालेली उधारी, हात उसने घेतलेले पैसे, बँकांचे कर्ज सुखदुःखात लागणारा पैसा कुठून उपलब्ध करायचा, चालू घडामोडी जीवन शैलीला लागणारा खर्च कसा करावा अशा निसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाला मोठ्या आर्थिक स्वरुपाच्या मदतीची गरज असून, त्याला आता तरी तत्काळ कोणतीच वाट न पाहता शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी असे परिसरातील शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.

ज्वारी पिकाचा खर्चही निघत नसून धान्य विकत घेण्याची वेळ आली आहे. कपाशीला ही एकरी पंचवीस हजार रुपये खर्च लागलेला असताना खर्च निघणे कठीण झाले आहे. शासनाने योग्य ते ओल्या दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे.
- भगवानसिंग चव्हाण,
शेतकरी, पोरज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com