"लॉट एन्ट्री' न झाल्याने चुकारे रखडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

अमरावती : पोर्टलवर तूर व हरभरा खरेदीची लॉट एन्ट्री झाली नाही. त्यामुळे चालू खरीप हंगाम निम्मा उलटला असतानाही राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नाहीत. चुकाऱ्यांसाठी असलेली शासकीय प्रक्रिया किचकट असल्याने हा विलंब होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नाफेडने पोर्टलवर लॉट एन्ट्रीची जबाबदारी एनएएमएल या कंपनीकडे दिली आहे.
मुंबईत कार्यकारी व्यवस्थापकांनी सर्व जिल्ह्यांतील विपणन अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी (ता.29) आयोजित केली आहे. बैठकीत विविध विषयांसह तूर व हरभऱ्याच्या चुकाऱ्यावर चर्चा होणार आहे.

सरलेल्या खरीप हंगामात नाफेडने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून किमान आधारभूत किमतीने तूर व हरभऱ्याची खरेदी केली. बारदाना, गोदामांची उपलब्धता व ग्रेडर्स नसणे अशा विविध कारणांनी खरेदी कधी सुरू तर कधी बंद होती. त्यामुळे चुकाऱ्याची गती मंद राहिली. अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांना खाली हाताने परतावे लागले.
शासकीय खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याचे किमान 25 क्विंटल उत्पादन खरेदीची मर्यादा होती. त्यासाठी त्याचे पेरणीक्षेत्र तपासण्यात आले. एकरी 5 क्विंटल 90 किलो, अशी मर्यादा होती. अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र व उत्पादन अधिक होते. त्यासाठी एकापेक्षा अधिक टप्पे पाडावे लागले. परिणामी एका शेतकऱ्याचे नाव चुकाऱ्याच्या यादीत दोन किंवा तीनपेक्षाही अधिक वेळा आले. नोंदणी क्रमांक एकच असला तरी यादीत नाव वारंवार दिसल्याने आक्षेप घेण्यात आले. शिवाय संबंधित शेतकऱ्याच्या नावासमोर पंचवीस क्विंटलच्या मर्यादेत खरेदी नसल्यास त्याचे नाव पोर्टलवर येत नाही व त्याचा चुकारा रखडतो. असा प्रकार राज्यातील सर्वच खरेदी केंद्रांवर झाल्याने राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे चुकारे रखडले आहेत.

Web Title: toor news