घाटपुरी येथे अल्‍पवयीन युवतीवर अत्‍याचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

खामगाव तालुक्‍यातील घाटपुरी येथील एका मानसिक दृष्ट्या कमकूवत अल्पवयीन युवतीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली. हैद्राबाद, उन्नाव तसेच बुलडाणा जिल्‍ह्‍यातील जळगाव जामोद यासारख्या महिला अत्‍याचारासंबंधीच्‍या  घटनांनी समाजमन ढवळून  निघाले 

खामगाव (जिल्हा बुलडाणा) : हैद्राबाद, उन्नाव तसेच बुलडाणा जिल्‍ह्‍यातील जळगाव जामोद येथील महिला अत्‍याचारासंबंधीच्‍या  घटनांनी समाजमन ढवळून  निघाले असतांना खामगाव तालुक्‍यातील घाटपुरी येथील एका मानसिक दृष्ट्या कमकूवत अल्पवयीन युवतीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना काल मंगळवारी रात्री घडली. 

याबाबत प्राप्‍त माहतीनुसार पीडित मुलगी व परीवार हे खूपसे नगर घाटपुरी येथे भाड्याने राहतात. दरम्‍यान काल सायंकाळी 7 वाजता पिडितेने तिच्‍या आईला दुकानात जाते, असे सांगितले. यावेळी आरोपी ज्ञानेश्‍वर तायडे व दत्‍ता साठे यांनी तिला लग्‍नाचे आमिष दाखवून व तिला निर्जन स्‍थळी नेवून तिच्‍यावर अत्‍याचार केला. बराच वेळा होवून देखील घरी न परतल्याने घरातील मंडळींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान तिने सर्व हकीकत कथन केल्यानंतर कुटूंबियांनी शिवाजी नगर पोलिस स्‍टेशनला जावून घडलेला प्रकाराची माहिती दिली. त्‍यानुसार पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले व दोन्‍ही आरोपींना अटक केली. 

हेही वाचा - दीड दिवसाआड एक विनयभंग

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे एका 55 वर्षीय महिलेवर अत्याचार आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली ताजी असतांनाच घडलेल्‍या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: torture on a young woman