esakal | दसऱ्याच्या दिवशी सोन्यासारखे दिसू लागले पर्यटन स्थळ
sakal

बोलून बातमी शोधा

tourist are started coming to touring places

व्ही कॅन फाउंडेशने  सदस्यांनी गडचांदूर शहरालगत असलेल्या अमलनाला वेस्ट वेअर पर्यटनस्थळी जाऊन रविवारी ता.२५ रोजी स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठया संख्येने प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बाटल्या आदी गोळा करून नष्ट करण्यात आले.  

दसऱ्याच्या दिवशी सोन्यासारखे दिसू लागले पर्यटन स्थळ

sakal_logo
By
दिपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर ) -  'निसर्ग आहे म्हणून मानव आहे' अशी धारणा जोपासणाऱ्या गडचांदूरातिल वाइल्डलाईफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन अँड नेचरिंग फाउंडेशने व्ही कॅन फाउंडेशनने दसऱ्याच्या  दिवसी अमलनाला पर्यटनस्थळी स्वछता मोहीम राबवित पर्यटनाला स्वच्छ सुंदर केले असून पर्यटनस्थळ जणू सोन्यासारखा दिसू लागलं आहे.

व्ही कॅन फाउंडेशने  सदस्यांनी गडचांदूर शहरालगत असलेल्या अमलनाला वेस्ट वेअर पर्यटनस्थळी जाऊन रविवारी ता.२५ रोजी स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठया संख्येने प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बाटल्या आदी गोळा करून नष्ट करण्यात आले.  विविध वृक्षाचे बिया जमा करून पावसाळ्यात त्या बियांचे रोपण करणे, वटवृक्षाचे फांद्या लावणे आदी कामे व्ही कॅन फाउंडेशन चे सतत सुरू असतात.

तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

स्वच्छता मोहीमेसोबतच कचरा करू नये, पर्यटनाचे संवर्धन करा, स्वच्छता राख अश्या अनेक प्रकारचे पोस्टर पर्यटन स्थळी लावण्यात आले. या यावेळी  एन जी ओ चे प्रितेष मत्ते , सुयोग भोयर, दीपक खेकारे, डॉ.लोनगाडगे,अक्षय मेश्राम, राकेश गोरे, श्रीनिवास पवार , हर्षल ढवले, रोशन गेडाम, वैभव राव, पवन खड़सीगे, स्वप्निल आत्राम,आशीष पेटकर,दीपक पाटिल, ऋषि तुराणकर व इतर युवा मित्र सहभागी झाले होते यांची उपस्थिती होती.

प्रशासन लोकप्रतिनिधी उदासीन

गेल्या कित्येक वर्षांपासून  राजुरा विधासभेत प्रसिद्ध असलेल्या अमलनाला पर्यटन स्थळाला अजूनही चालना मिळाली नसून प्रशासन व लोकप्रतिनिधी  उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक सोयी सुविधेपासून वंचित असलेल्या पर्यटनाचा विकास कधी होणार ह्या कडे पर्यटकांच्या नजरा लागल्या आहे.

बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद

कचऱ्यासाठी कचरा कुंड्या नाहीत.

रोज शेकडो पर्यटकांची हजेरी असणाऱ्या पर्यटन स्थळीं काचऱ्या कुंड्या उपलब्ध नसल्याने पर्यटक पाहिजे त्या जागेवर कचरा फेकून मोकळा होत असून कचरा कुंड्याची नितांत गजर असल्याचे दिसून येते.


संपादन - अथर्व महांकाळ