ताडोबातील पर्यटकांचा मार्ग गावकऱ्यांनी रोखला

tadoba
tadoba

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पळसगावच्या लोकांनी पर्यटकांचा रोखून धरला मार्ग. मोहर्ली प्रवेशद्वारावर शंभरावर गावकऱयांचा ठिय्या मांडला आहे.

गावकऱयांना ये-जा करण्यास, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी नेहमी त्रास देतात. त्यामुळं ताडोबा व्यवस्थापनाला धडा शिकवण्यासाठी गावकऱयांनी आज पहाटे चार वाजताच मोहर्ली गेटसमोर ठिय्या देऊन पर्यटकांची वाहनं रोखून धरली.

रविवार असल्यानें आज ताडोबात मोठी गर्दी असते, पण सकाळच्या फेरीसाठी एकही जिप्सी ताडोबात जाऊ शकली नाही. गावकाऱयांच्या या आंदोलनामुळं ताडोबा व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com