चौकाचौकांत वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द होताच शहरातील पोलिस बंदोबस्त थंडबस्त्यात गेला. पावसाळी वातावरणात शहरातील निम्मे सिग्नल बंद होते. अशा स्थितीत वाहतूक विभागाचे पोलिसही माघारी फिरल्याचे चित्र शहरात निर्माण झाले. त्यामुळे दक्षिण नागपुरातील प्रमुख चौकांत वाहनचालकांना प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

शुक्रवारचा पूर्ण दिवस शहरातील कडक बंदोबस्ताने विशेष गाजला. कारण बहुतेक सर्वच चौकांमध्ये नेहमीपेक्षा दुप्पट संख्येने पोलिस तैनात होते. महत्त्वाचे म्हणजे हेल्मेट कारवाईपेक्षाही वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे का याकडेच प्रत्येकाचे लक्ष होते. मात्र दुपारी झालेल्या दमदार पावसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शनिवारी होणारा दौरा रद्द झाला. त्याची औपचारिक घोषणा होताच तासाभरात बंदोबस्त थंडबस्त्यात गेला. त्यातच ठिकठिकाणी महालक्ष्मी पूजनाच्या कार्यक्रमांत हजेरी लावण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक या कोंडीत अडकले. अनेकांना तर तुकडोजी पुतळा चौक ओलांडताना तब्बल दोन तासांची कसरत करावी लागली. येथे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्याचा ताण मानेवाडा, अजनी, सोमवारी क्‍वॉर्टर यांसह क्रीडा चौकावरदेखील पडला. मात्र सिग्नल बंद असल्याने चौकाचौकांत वाहतूक कोंडी निर्माण झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic jam