वाहतूक पोलिसाला लाच घेताना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नागपूर : एमआयडीसी विभागातील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. ही कारवाई आज शनिवारी सायंकाळी करण्यात आली. अशा लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांमुळे खाकी वर्दी मलिन होत असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे स्पष्ट होत आहे. राजकुमार कोडापे असे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

तक्रारकर्ता ऑटोचालक हा हिंगणा रोडने ऑटो चालवितो. ऑटोतून अवैध प्रवाशांची वाहतूक करताना कारवाई न करण्यासाठी राजकुमार कोडापेने त्याला पैशाची मागणी केली होती. ऑटोचालकाची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार शनिवारी एसीबीच्या पथकाने सीआरपीएफ गेटजवळ सापळा रचला. आपली ड्यूटी संपवून राजकुमार सीआरपीएफ गेटजवळ आला आणि त्याने ऑटोचालकाची भेट घेतली. ऑटोचालकाने पाचशे रुपये देताच दबा धरून बसलेल्या पथकाने राजकुमारला रंगेहात पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून शिपाई राजकुमार कोडापे यास अटक केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पैसे कमविण्यासाठी चढाओढ असून त्यासाठी हाताखालील पोलिस कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कनिष्ठ कर्मचारी चार पैसे जास्त पैसे कमविण्याची धडपड करीत असल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic police arrested for taking bribe