
अमरावती - आश्रमशाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मेळघाटच्या नागापूर आदिवासी आश्रमशाळेत आज सायंकाळी घडली. या दुर्घटनेत अन्य तीन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींना परतवाडा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.