प्रवाशी वाहन व दुचाकीचा भीषण अपघात; दोन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

प्रवाशी वाहन क्रमांक एमएच 28 आर 2978 ही नांदुराकडून जळगाव जामोदकडे जात असताना निमगावकडून नांदुराकडे येणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एमएच 28 एम 8210 यांच्यात हॉटेल शिवनेरी जवळ अपघात झाला.

नांदुरा (जि.बुलडाणा) : नांदुरा ते जळगाव जामोद रस्त्यावरील हॉटेल शिवनेरी जवळ आज 9 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेदरम्यान प्रवाशी वाहन व दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार की, प्रवाशी वाहन क्रमांक एमएच 28 आर 2978 ही नांदुराकडून जळगाव जामोदकडे जात असताना निमगावकडून नांदुराकडे येणाऱ्या मोटार सायकल क्रमांक एमएच 28 एम 8210 यांच्यात हॉटेल शिवनेरी जवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील नारायण गजानन लोळ (वय 21) व पुरुषोतम महादेव जवरे (वय 23) दोघेही रा. नारायणपूर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. 

महत्त्वाची बातमी - अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व ‘विक’

तर टाटा मॅजिक मधील मो. रजिक मो. रफिक (वय 42) रा. गोधनापूर तालुका खामगाव हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर, प्रवीण डवंगे, वैभव काजळे यांच्यासह नांदुरा पोलिस स्टेशनचे नापोका शाम आघाव हे रुगणवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन मृतक व जखमींना तत्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tragic accident in passenger vehicle and two-wheeler