खापरखेडा - कन्हान नदीच्या पात्रात युवकाच्या पाय घसरून खोल पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी समोर आली. सदर घटना खापरखेडा पोलिस स्टेशन हद्दीतील बिना जोड जवळ असणाऱ्या बीड बीना शिवारात कन्हान नदीच्या पात्रात घडली. मृतकाला नदीवर आनंद घेत सेल्फी फोटो काढणे जिवावरच बेतले.