Amravati News: अमरावतीत शेतात भाजीपाला धुण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात १८ महिन्याच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू
Drowning Case: अमरावती जिल्ह्यातील रसूलपूर येथे शेतातील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आई दुसऱ्या कामात असताना खेळताना हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमरावती : शेतात भाजीपाला धुण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बुडाल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. १९) रात्री आठच्या सुमारास रसूलपूर येथील शकील नामक व्यक्तीच्या शेतात ही घटना घडली, असे खोलापुरीगेट पोलिसांनी सांगितले.