मालगाडी रुळावरून घसरली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर - नरेंद्रनगर यार्डमधून कंटेनर घेऊन जाणारी मालगाडी मुख्य मार्गावर येताच अचानक एका डब्याचे दोन चाक रुळावरून घसरले. परंतु, थोडक्‍यात मोठी दुर्घटना टळली. तत्काळ रुळावरून घसरलेल्या डब्यापासून गाडी वेगळी करून पुढे सोडण्यात आल्याने काही वेळातच वाहतूक सुरळीत झाली.

नरेंद्रनगरातील यार्डमधून कंटेनर घेऊन ही मालगाडी दक्षिणेकडे जाण्यासाठी निघाली. मुख्य  मार्गावर येताच एका डब्याची चाके रुळावरून घसरली. पण, वेग फारच कमी असल्याने गाडी थांबविण्यात आली. गाडीचे काही डबे मुख्य मार्गावर तर उर्वरित डबे लूपलाइनवर होते. यामुळे मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबण्याची शक्‍यता होती. यामुळे लागलीच कपलिंग काढून मालगाडी पुढच्या प्रवासाला रवाना झाली. तर, सुमारे २० डबे यार्डमध्येच राहिले. 

प्रत्यक्ष घटनास्थळावरील चित्रावरून रुळावरून घसरलेले चार सुमारे ४०० मीटर घासत  असल्याचे दिसून येते. इंजिन चालकाने मुख्यमार्गावर जाताना ब्रेक लावले असावे त्याचवेळी  चाक जाम झाल्याने ही घटना घडली असावी, अशी शक्‍यता दुरुस्तीकार्य करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्याने व्यक्त केली. वेग कमी असल्याने फारसे नुकसान झाले नाही; पण डबे आडवे झाले असते तर रेल्वेवाहतूक विस्कळीत होण्याचा धोका होता.

Web Title: train derailed declined