रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; नऊ दलाल जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

नागपूर  : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, आरपीएफच्या नागपूर विभागातर्फे शुक्रवारी एकाच दिवशी रेल्वे तिकिटांचा कारभार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यात एकूण 9 दलाल अडकले. त्यांच्याजवळून 1.58 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आरपीएफच्या मोतीबाग ठाण्याचे निरीक्षक जी. ए. गरकल, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पगारे, उपनिरीक्षक सी. के. पी. टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वातील वेगवेगळ्या पथकांनी नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी छापामारी करीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पाच दलालांना अटक केली. हिंगण्यातून अरविंद कुशवाह (29), दहेगाव येथून रूपेश गिरी (29), विद्यानगर, नंदनवन येथून देवीप्रसाद गुप्ता (28), लक्ष्मीनारायणनगर, हिंगणा येथून रामप्रकाश चौहान (42) याला पकडण्यात आले. 
छिंदवाड्यात करण्यात आलेल्या कारवाईत उमरानाला येथील रहिवासी प्रबंजन गिरहारे (30) हा अडकला. तसेच टास्क टीम प्रभारी मो. मुगीसुद्दीन यांच्या नेतृत्वात मंडला येथे कारवाई करण्यात आली. येथून मधुर कुरिअर कंपनीचा संचालक अशोक गुडवाणी, मिश्रा टायपिंग सेंटरचा संचालक आकाश मिश्रा आणि अंजली कॉम्प्युटर्सचा संचालक नवनीत साहूला ताब्यात घेण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Train ticket markets; Nine brokers jailed