नागपूरमार्गे जाणाऱ्या डझनभर रेल्वे रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नागपूर  : मुंबईतील पावसाने रेल्वेवाहतुकीला ब्रेक लावला आहे. मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. नागपूरमार्गे धावणाऱ्या सुमारे डझनभर रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यातील 9 ट्रेन्स मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या आहेत.

नागपूर  : मुंबईतील पावसाने रेल्वेवाहतुकीला ब्रेक लावला आहे. मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. नागपूरमार्गे धावणाऱ्या सुमारे डझनभर रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. त्यातील 9 ट्रेन्स मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या आहेत.
रविवारी मुंबईहून रवाना होणारी 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस, 12869 मुंबई-हावडा साप्ताहिक एक्‍स्प्रेस, 11401 मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्‍स्प्रेस, 12261 मुंबई-हावडा दुरंतो, 18029 एलटीटी-शालीमार एक्‍स्प्रेस, 12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्‍स्प्रेस, 12289 मुंबई-नागपूर दुरांतो, 12809 मुंबई-हावडा मेल, 12145 एलटीटी-पुरी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली. जाणाऱ्या गाड्या अडकून पडल्याने परतीच्या प्रवासातही अडचण निर्माण झाली आहे. रविवारी सुटणाऱ्या 12102 हावडा-एलटीटी एक्‍स्प्रेस आणि 12810 हावडा-मुंबई मेल, 12669 मुंबई-हावडा एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. या दोन्ही गाड्या नागपुरात पोहोचू शकणार नाही. सोमवारी धावणारी 11402 नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्‍स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.
रविवारी नागपूरहून सुटणारी 12140 सेवाग्राम एक्‍स्प्रेस आणि 12290 मुंबई दुरंतो एक्‍स्प्रेस ऐनवेळी रद्द करण्यात आली. रविवार सायंकाळी नागपूरहून रवाना झालेली 12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्‍स्प्रेसला वर्ध्यातच थांबवून घेण्यात आले. 12152 हावडा-एलटीटी एक्‍स्प्रेसला सेवाग्राम स्थानकावर थांबवून घेण्यात आले. या शिवाय 12139 मुंबई-नागपूर एक्‍स्प्रेसला नाशिकहूनच परतीच्या मार्गावर पाठविण्यात आले.
.........
मुंबई दुरांतो इगतपुरीत रोखली
शनिवारी रात्री नागपूरहून रवाना झालेली मुंबई दुरांतोला रविवारी सकाही इगतपुरीतच थांबविण्यात आले. यामुळे नागपूरहून गेलेल्या शेकडो प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. स्टेशन मास्टरकडून चुकीची माहिती मिळत असल्याने गोंधळात अधिकच भर पडला. प्रवाशांमधील वाढता रोष लक्षात घेऊन अखेर रेल्वे प्रशासनाने बसची व्यवस्था करीत प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trains canceled via Nagpur