ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाकडून खेळाडूचे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : अनैसर्गिक अत्याचाराची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत बडोद्याचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने कराटेपटूचे तब्बल पावणेचार वर्षे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी व्यावसायिकाला अटक केली आहे.

नागपूर : अनैसर्गिक अत्याचाराची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देत बडोद्याचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने कराटेपटूचे तब्बल पावणेचार वर्षे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी व्यावसायिकाला अटक केली आहे.
संजयसिंग तवर (37) रा. बडोदा, गुजरात असे आरोपीचे नाव आहे. तर 18 वर्षीय पीडित मूळ मौद्याचा रहिवासी असून राज्यस्तरीय कराटेपटू आहे. स्पर्धेसाठी 2016 मध्ये तो नंदूरबारला गेला होता. रेल्वेतून परतत असताना संजयसिंग सोबत त्याची भेट झाली. दोघांनी गप्पा केल्यानंतर नागपुरात येणे झाल्यास भेटण्याचे ठरविले. एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतले. जुलै 2016 मध्ये आरोपी कामानिमित्त नागपुरात आला. तो वाडीच्या नाका नंबर 10 येथील रूमवर थांबला होता. त्याने फोन करून पीडिताला भेटीसाठी बोलावून घेतले. त्यावेळी पीडित अल्पवयीन होता. संजयसिंगच्या अतिआग्रहामुळे तो जाण्यास तयार झाला. रात्री उशिरापर्यंत फिरणे, खाण्यापिण्याचा क्रम झाल्यानंतर पीडिताला गुंगी यायाला लागली. त्याचाच फायदा घेत आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या संबंधांचे त्याचे चित्रीकरणही केले. यानंतर तो नागपुरात येईल तेव्हा पीडिताला बोलावून घ्यायचा. त्याने नकार दिल्यास संबंधांची क्‍लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करीत होता. वेगवेगळ्या ठिकाणी देऊन तो अत्याचार करायचा. बदनामीच्या धाकाने पीडित तब्बल पावणेचार वर्षे यातना सोसत होता. मार्च 2019 पर्यंत हा प्रकार सुरू होता. अत्याचार असाह्य झाल्याने पीडिताने हिंमत करीत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात पोहचून तक्रार दिली. पण, घटनास्थळ वाडी हद्दीत असल्याने अखेर त्याने वाडी ठाणे गाठून तक्रार दिली. वाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अनैसर्गिक अत्याचार आणि पोक्‍सो ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल केला. तत्परतेने शोध घेत आरोपीला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From a transport professional Sexual abuse of a player