हा तर मृत्यूचा सापळा...

जीव धोक्‍यात घालून फलाट ओलांडताना प्रवासी.
जीव धोक्‍यात घालून फलाट ओलांडताना प्रवासी.

नवेगावबांध (गोंदिया) : देवलगाव रेल्वे स्थानकावर पादचारी मार्ग नसल्यामुळे तसेच उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी वृद्ध, महिला, आजारी प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाचे रखडलेले काम रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरू करावे, तोपर्यंत तात्पुरत्या पादचारी मार्गाची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे. 
देवलगाव रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने एका कंत्राटदाराकडून उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कंत्राटदाराने हे काम पूर्ण न करता अर्धवट सोडून दिले. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
तिकीट घर फलाट क्रमांक एकवर आहे.

त्यामुळे फलाट क्रमांक दोनवरून तिकीट घराकडे जाण्यासाठी पादचारी मार्ग किंवा उड्डाणपूल नसल्यामुळे प्रवाशांना उंच फलाटावरून चढावे-उतरावे लागते. वृद्ध प्रवासी, दिव्यांग, महिला, आजारी प्रवाशांना चढण्या-उतरण्याचा त्रास सहन करावा लागतो. 


2017 पासून नवेगावबांध येथील नागरिक रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन उड्डाणपुलाची किंवा पादचारी मार्गाची व्यवस्था व्हावी, यासाठी प्रयत्नरत आहेत. उलटटपाली पत्र देऊन रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्‍वासनदेखील नवेगावबांधवासींना दिले होते.

जानेवारी महिन्यात सरपंच अनिरुद्ध शहारे यांनीसुद्धा रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन, पादचारी किंवा उड्डाणपुलाची मागणी केली होती. परंतु, या उड्डाणपुलाचे अद्यापही रखडले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी परिसरातील प्रवाशांनी केली आहे. 

पावसामुळे या उड्डाणपुलाचे काम रखडले होते. आता लवकरच उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात केली जाईल. 
- कालीशंकर दास, स्टेशन प्रबंधक, देवलगाव. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com